22 July, 2012

पुणेकर आणि पावसाळा


पु. ल. चे "पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर" हे तुम्ही वाचल किवां ऐकलं असेल. नसेल तर युटूब वर बघुन घ्या.



यापूर्वी ही मी "खरा पुणेकर" या विषयावर लिहले आहे. "खरा पुणेकर" कसा होता किवां कसा आहे याही पेक्षा तो "खरा पुणेकर" कसा असावा यामध्ये मला जास्त रस आहे .

आता पावसाला चालू आहे. "खरा पुणेकर" कितीही कामाच्या व्यापात असला तरी निसर्गातील या सुंदर बदलाला तो अनभिज्ञ/उदासीन नसतो. "पाउस आला आता वर्षभर पिण्याच्या पाण्याची सोय झाली" अश्या व्यावहारिक दृष्टीकोनापुरत्या  त्याच्या भावना/विचार मर्यादित नसतात.

पावसाला आला की "खरा पुणेकर" कवी होतो आणि आपल्या भावना तो शब्दांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. मग ती कविता असेल किंवा एखादा लेख. तो आकाशातील सौदर्य रंगांच्या साह्याने कागदावर उमटवतो आणि चित्र चांगल जमलच तर ते प्रदर्शनात ठेवतो. घराच्या आजूबाजूला एखादा सुंदर पक्षी दिसला तर तो उत्साहाने फोटो घेतो.


एका निवांत संध्याकाळी कोणी आणखीन एका  पुणेकराने आयोजीत केलेली संगीताची मैफील तो चुकवत नाही, कारण पावसाळा चालु झाल्यानंतर "राग मल्हार" ऐकण्याची मजा त्याला ठाऊक असते. याच्यासाठी तो पैसेही मोजायला तयार असतो.


एकंदर त्याची भावना निसर्गाने दिलेल्या या प्रेमाबद्दल कृतज्ञनेची असते आणि तो राग मल्हार जमावा म्हणून कलाकाराने केलेल्या तपशर्ये/मेहेनती विषयीच्या आदराची असते.
 
पावसाला आला की "खरा पुणेकर" ...