05 September, 2010

Marathi Poems

काही दिवसांपूर्वी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा "आयुष्यावर बोलू काही" चा जुना कार्यक्रम टीवीवर बघितला. खूप छान कविता आणि गाणी आहेत. संदीप खरेच्या कविता कुणाला आवडत नाहीत. त्याच्या कवितांचे पुस्तक आहे माझ्याकडे.

म्हंटल आपणही करावा प्रयत्न कविता करण्याचा, मनातील भावना व्यक्त करण्याचा. काहीशी अपूर्ण अशी आणि थोडीशी बोल्ड अशी कविता साधार करतो :

 "कोणीतरी"  

कोणीतरी माझ्या डोळ्यात बघून हसावे, लाजावे
कोणीतरी माझ्या केसांतून हात फिरवावा, कुरवाळावे
कोणीतरी ठेवावा माझ्या हातांवर हात, ओठांवर ओठ
कोणीतरी म्हणावे "तू माझा मी फक्त तुझीच"
कोणीतरी, जिच्यासाठी मी जगावे, मरावे !